Thu, Apr 25, 2019 13:28



होमपेज › Solapur › मुख्यमंत्री महापूजेला उपस्थित राहणार नाहीत : गिरीश महाजन(व्हिडिओ)

मुख्यमंत्री महापूजेला उपस्थित राहणार नाहीत : गिरीश महाजन(व्हिडिओ)

Published On: Jul 22 2018 1:21PM | Last Updated: Jul 22 2018 1:44PM



मंगळवेढा : प्रतिनिधी

वाचा : वारकऱ्यांना वेठीस धरणारे छत्रपतींचे मावळे नाहीत : मुख्यमंत्री

आषाढी वारीच्या निमित्‍ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्‍ते होणारी विठ्ठल रुक्‍मीची शासकीय महापूजा रद्द करण्यात आली आहे. आज सकाळपासून पंढरपूर, सोलापूर आणि मंगळवेढ्यात मराठा क्रांती मोर्चाने हिंसक वळण घेतले आहे. ठिकठिकाणी एसटी बस फोडण्यात आल्‍या आहेत तर, मंगळवेढ्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या गाड्या अडविण्यात आल्‍या आहेत. या सर्व पार्श्चभूमीवर मराठा आणि धनगर समाजाच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा रद्द करण्यात आल्‍याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांना दिली. 

वाचा : मराठा आंदोलनाच्या धास्तीने मंगळवेढा आगार बंद

मंगळवेढ्यात आज सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या गाड्या अडविण्यात आल्‍या. यावेळी याबाबत विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री  पुजेला येणार नाहीत असे स्पष्ट केले. यामुळे भाजपमधील वजनदार मंत्र्याने दिलेल्या या शब्दामुळे आंदोलकांनी गिरिश महाजनांना सुमारे तासभरानंतर सोडले. 

वाचा : मंगळवेढ्यात सहकार मंत्र्याची गाडी अडवली, सहकार मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना फोन(व्हिडिओ)

गिरीश महाजन म्‍हणाले, ‘‘पंढरपुरमध्ये १५ लाख भाविक येणार आहेत. अशातच मराठा समाजाचे आंदोलन तिव्र झाले आहे. त्‍यामुळे मराठा समाजाच्या भावना लक्षात घेवून आणि वारीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये सासाठी येथील सर्व प्रकार आम्‍ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरला येवू नये असे सांगितले आहे. त्‍यामुळे याठिकाणची परिस्‍थिती लक्षत घेवून मुख्यमंत्री विठ्ठल रुक्‍मीणीच्या महापुजेसाठी पंढरपूरला येणार नाहीत.’’