Wed, Apr 24, 2019 15:51होमपेज › Solapur › सोलापूर : चालत्या बसमधून पडून बालक ठार

सोलापूर : चालत्या बसमधून पडून बालक ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मंगळवेढा : प्रतिनिधी 

मंगळवेढा आगारातील मंगळवेढा ते पंढरपूर या चालत्‍या बसमधून आपत्कालीन दरवाजा उघडून खाली पडल्याने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या अपघातात बालकाच्या डोक्‍यावरून बसचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मल्लेवाडीजवळ ही घटना घडली आहे.  सिद्धराया गुरुबसपा माळाबागी( वय ६, रा. उटगी ता. जत, जि. सांगली) असे त्या मुलाचे नाव आहे. 

मंगळवेढा आगारातील मंगळवेढा-पंढरपूर (एमएच २० बीएल ००८४) या बसमधून सिध्दराया प्रवास करीत होता. मल्लेवाडीजवळ बस आली असता बसचा आपत्कालीन दरवाजा उघडून तो खाली पडला. यावेळी बसचे चाक त्याच्या डोक्‍यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचे वडील  गुरुबसपा शिवाप्पा माळाबागी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.


  •