Sat, Feb 16, 2019 17:34होमपेज › Solapur › सोलापूर : माजी आ. रविकांत पाटलांची फसवणूक

सोलापूर : माजी आ. रविकांत पाटलांची फसवणूक

Published On: Dec 08 2017 12:35PM | Last Updated: Dec 08 2017 12:35PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

इसारा पावती करुन पाच्छा पेठेतील जागा परस्पर तिसर्‍याच व्यक्तीला भाड्याने देऊन माजी आमदार रविकांत पाटील यांची फसवणूक केली आहे. फसवणूक करणार्‍याविरुध्द जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास उर्फ विकास संभाजी तळभंडारे (रा. प्लॉट नं. 28, न्यु पाच्छा पेठ, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत माजी आ. रविकांत शंकरप्पा पाटील (वय 62, रा. सोरेगाव, विजापूर रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

रविकांत पाटील यांच्या नावावर असलेल्या महानगरपालिका हद्दीतील न्यु पाच्छा पेठेतील   सिटी सर्व्हे नं. 10437 फायनल प्लॉट नं. 28 ए या मिळकतीमध्ये तळभंडारे यांची अविभक्त 743.49 चौरस मीटर जागा आहे. ही जागा तळभंडारे याने पाटील यांना जागा खरेदी खत होईपर्यंत कोणासही लिहून वैगेरे देणार नाही, या अटीवर इसारा पावती करून पाटील यांच्याकडून 10 हजार रुपये घेतले होते. तरीही तळभंडारे याने त्यांच्या नावावरील जागा ही शिवप्रकाश चव्हाण व घनशाम चव्हाण यांना भाडे करार करुन त्यांच्या ताब्यात दिली. ही बाब समजल्यानंतर पाटील यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याबाबतची फिर्याद दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक बनकर याबाबत तपास करीत आहेत.