Wed, Jul 17, 2019 18:31होमपेज › Solapur › फुकटात चहा मागणाऱ्या भाजप कार्याध्यक्षावर गुन्हा

फुकटात चहा मागणाऱ्या भाजप कार्याध्यक्षावर गुन्हा

Published On: Apr 21 2018 9:54PM | Last Updated: Apr 21 2018 9:54PMकुर्डुवाडी : प्रतिनिधी  

चहा नाष्ट्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरून आठ जणांनी विजया लक्ष्मी कॅन्टीनमधील साहित्याची तोडफॊड केली आणि  दिवसभराचा गल्ला घेऊन निघून गेले.

याबाबत निलेश राजू सवणे (वय २८ रा.कुर्डुवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाजप शहर कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह फय्याज दाळवाले, विराज सातारकर, किरण, सुहास सरडे, बालाजी, राहूल, कारंजकर या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.२० एप्रिल रोजी रात्री १०.३० च्या सुमारास बायपास रोडवरील लोंढे हॉस्पीटलसमोर विजया लक्ष्मी कॅन्टीन येथे वरील आठ जणांनी चहा नाष्ट्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन कॅन्टीन मधील ४ टेबल व २० खुर्च्यांची मोडतोड करून कॅन्टीनमधील चिप्स, बिस्कीट, कुरकूरे इ. सामानांची नासधूस केली व सुमारे १५ हजार रूपयांचे नुकसान केले. 

शिवाय कॅन्टीनमधील दिवसभराचा झालेला धंदा सुमारे ३००० रुपये घेऊन निघून गेले. याबाबत सवणे यांच्या फिर्यादीवरून कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल हनुमंत माळी हे करीत आहेत.