Sun, Mar 24, 2019 12:27होमपेज › Solapur › बेळगावच्या दोन डॉक्टरांवर सोलापुरात गुन्हा

बेळगावच्या दोन डॉक्टरांवर सोलापुरात गुन्हा

Published On: Feb 26 2018 3:18PM | Last Updated: Feb 26 2018 3:18PMसोलापूर : प्रतिनिधी

पोटगीच्या कारणावरुन मेव्हण्यास शिवीगाळ करुन धमकी दिल्याप्रकरणी बेळगावच्या डॉक्टर बाप-लेकांसह तिघांविरुध्द सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. उल्हास उमेश यडूर (वय 37), डॉ. उमेश भीमण्णा यडूर (वय 64), प्रशांत उमेश यडूर (वय 33, रा. घर नं. 47, हनुमाननगर, हिंदवाडी, बेळगाव, कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत शिवप्पा अर्जुन कुंभार (वय 32, रा. पद्मानगर, अक्कलकोट रोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत हवालदार कांबळे अधिक तपास करीत आहेत.