Wed, Aug 21, 2019 15:00होमपेज › Solapur › यात्रा काळातही सांडपाणी चंद्रभागेत (Video) 

यात्रा काळातही सांडपाणी चंद्रभागेत (Video) 

Published On: Jul 21 2018 1:12PM | Last Updated: Jul 21 2018 10:37AMपंढरपूर : प्रतिनिधी

लाखो वारकऱ्यांनी विठ्ठलाची पंढरी गजबजली असून आषाढी यात्रा सोहळा आता फक्त दोन दिवसांवर आलेला आहे. तरीही चंद्रभागेत मिसळणार्या ड्रेनेजच्या सांडपाण्याला आळा घालण्यात पालिकेला यश आलेले नाही. मैलामिश्रित सांडपाण्यातून वाट काढत भाविकांना चंद्रभागेत जावे लागत आहे. त्याच प्रदूषित पाण्यात स्नान उरकावे लागत आहे. 

येथील गर्दीच्या उद्धव घाटावर असलेल्या ड्रेनेज पाईप लाईनच्या मेन होलमधून अतिरिक्त झालेलं पाणी उचंबळून बाहेर येत असलेलं दिसून येत आहे. या घाटावर असलेल्या मंदिरात याच सांडपाण्यातून वाट काढत, पालिकेविषयी नाराजी बोलून दाखवत भाविक जात असल्याचे सांगत आहेत.