Sat, Feb 16, 2019 22:53होमपेज › Solapur › आज चैत्र एकादशी; टाळ, मृदंगाच्या गजरात निनादली पंढरी(Video)

टाळ, मृदंगाच्या गजरात निनादली पंढरी(Video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

चैत्र एकादशी निमित्त लाखो वारकरी भाविकांच्या उपस्थितीने पंढरी नगरी गजबजली असून टाळ, मृदंगाच्या निनादात चंद्रभागेचे वाळवंट फुलून गेले आहे. चैत्री एकादशी साठी पंढरीत २ लाखांवर भाविक दाखल झाले आहेत. तर विठ्ठल दर्शन रांगेत ६० हजारावर भाविक उभे आहेत.

आज(दि.२७) पहाटे पासूनच चंद्रभागेत स्नानासाठी वारकऱ्यांची गर्दी उसळली आहे. विठ्ठल मंदिर परिसर आणि ६५ एकरात मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी झाल्याचे दिसत आहे. मंदिर समिती, नगरपालिका प्रशासनाने यात्रेचे नियोजन चांगल्या प्रकारे केल्यामुळे तसेच पोलिस बंदोबस्त असल्यामुळे कुठेही कसलाही अनुचित प्रकार न घडता यात्रा सुरू आहे.

Tags : pandharpur, pandhari, chaitra vari, ekadashi, vitthal, pandurang


  •