होमपेज › Solapur › सांगोला शहरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे 

सांगोला शहरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे 

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 09 2018 1:36AM

बुकमार्क करा
सांगोला : वार्ताहर

शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सांगोला रोटरी क्लब व लोकसहभागातून सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे शहरातील विविध घडामोडींवर लक्ष ठेवून विपरीत घटना घडली तर त्याचा खुलासा कॅमेरांच्या माध्यमातून लवकर आणि खात्रीलायक होवू शकतो, असे मत पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी व्यक्‍त केले.

सांगोला रोटरी क्लब व सांगोला पोलिस स्टेशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने सांगोला शहरातील विविध ठिकाणी सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कामाचा शुभारंभ काल रविवार दि.7 जानेवारी रोजी कडलास नाका चौकामध्ये पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या शुभहस्ते व सांगोला रोटरी क्लब अध्यक्ष ऍड.विशाल बेले यांच्या अध्यक्षतेखाली सी.सी.टी.व्ही. कॅमेराचे उद्घाटन करून करण्यात आला. या उद्घाटन प्रसंगी  राजकुमार केंद्रे बोलत होते. यावेळी रोटरी सेक्रेटरी दत्तात्रय पांचाळ यांच्यासह रोटरी पदाधिकारी, सदस्य व शहरातील नागरिक उपस्थित होते.