Tue, Jul 16, 2019 11:38होमपेज › Solapur › जातीवादी सरकारकडून लोकशाहीचा घात: अजित पवार

जातीवादी सरकारकडून लोकशाहीचा घात: अजित पवार

Published On: Apr 09 2018 2:24PM | Last Updated: Apr 09 2018 2:24PMकराड : प्रतिनिधी

लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्‍या माध्यमांच्या प्रतिनिधींवर कारवाईचे आदेश काढणार्‍या भाजप सरकारकडून सत्तेचा जो उन्माद सुरू आहे. तो यापूर्वी कोणत्याच सरकारकडून झाला नव्हता. धर्म, जातीमध्ये भांडणे लावून भाजपाचे हे जातीवादी सरकार लोकशाहीचा घात करत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. 

कराड  येथे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी सोमवारी पत्रकार परिषद झाली. अजित पवार म्हणाले, खोटं बोलून, लबाड बोलून भाजप सरकार सत्तेवर आले, पण आज समाजातील प्रत्येक घटक अस्वस्थ आहे. प्रत्येकाची फसवणूक या सरकारने केली आहे. यांना निवडून देवून मोठी चूक झाली अशी भावना जनतेमध्ये आहे. लोकांवर पश्‍चाताप करण्याची वेळ आली आहे. यापूर्वी अनेक सरकारे आली पण येवढी बेबंदशाही जनतेने अनुभवली नव्हती. जीएसटी, नोटाबंदी यामुळे असंख्य उद्योग बंद पडले. अनेक अडचणीत आले. शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. आता उद्योजकांवरही आत्महत्येची वेळ आली आहे. 

शिवसेनेच्या भूमिकेबद्दल बोलताना  अजित पवार म्हणाले, शिवसेना डबल गेम खेळत आहे. सत्तेत त्यांच्यासोबत रहायचे आणि बाहेर त्यांच्याविरोधात बोलायचे ही जनतेची दिशाभूल आहे. सेनेचे बारा मंत्री असताना भाजपाच्या एकाही निर्णयाला त्यांनी विरोध केल्याचे आठवत नाही.  

उदयनराजे वरिष्ठ नेत्यांच्या यादीत ...

हल्लाबोल आंदोलन सुरू असताना  खा. उदयनराजे आपल्यासोबत दिसत नाहीत. या प्रश्‍नावर अजित पवार म्हणाले त्यांची काम करण्याची पध्दत वेगळी आहे, हे आपणा सर्वांना माहित आहे. ते स्वयंभू आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सोबतच्या बैठकांना ते उपस्थित असतात. त्यामुळे उदयनराजे आता विरिष्ठ नेत्यांमध्ये गणले जातात असे पवार म्हणाले.