Mon, Jun 17, 2019 02:12होमपेज › Solapur › मारहाणप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल

मारहाणप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल

Published On: Apr 21 2018 1:04AM | Last Updated: Apr 20 2018 10:10PMसोलापूर : प्रतिनिधी

महिलेला मारहाण करून तिच्याकडील 60 हजार रुपयांची सोन्याची चेन काढून घेतल्याप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत परवीन इरफान बागवान (वय 43, रा. बेगम पेठ, सोलापूर) या महिलेच्या फिर्यादीवरुन अल्ताफ शब्बीर शेख व इतर दोघेजण (रा. रेहमतबी टेकडी, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अल्ताफ शब्बीर शेख (वय 29, रा. रेहमतबी टेकडी, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरुन परवीन बागवान, तौसिफ बागवान, फिरोज बागवान, समिर सय्यद (रा. बेगम पेठ, सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी यशोधरा हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर परवीन बागवान व अल्ताफ शेख यांच्यामध्ये हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये परवीन बागवानची 60 हजार रुपयाची सोन्याची चेन शेख यांनी काढून घेऊन धमकी दिली. तर बागवान यांनी बुलेट मोटारसायकलवरुन येऊन शेख यांना मारहाण करुन व्याजाचे पैसे मागितले म्हणून जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक कोळेकर तपास करीत आहेत.

मुख्याध्यापकाला धमकी; पद्मशाली संस्थेच्या सचिवावर गुन्हा दाखल

मुख्याध्यापकाला राजीनामा देण्याच्या कारणावरून धमकी दिल्याप्रकरणी पद्मशाली शिक्षण संस्थेच्या सचिवाविरुध्द जेलरोड पोलिस  ठाण्यात  गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.मोहिनोद्दीन अलीमोहद्दीन कुमठे (रा. मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून दशरथ नारायण गोप (वय 51, रा. 256 गाळा, गवई पेठ, सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पद्मशाली शिक्षण संस्थेच्या श्रीराम इंग्लिश  मीडियम स्कूलमध्ये मोहिनोद्दीन कुमठे हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कुमठे यांनी मुख्याध्यापक पदावरून राजीनामा द्यावा म्हणून पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देण्यास सुरुवात केली आहे. पद्मशाली शिक्षण संस्थेतील कुमठे हे एका गटाचे असून गोप हे त्यांचे विरोधी गटाचे आहेत. त्यामुळे गोप यांनी 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता शाळेच्या कार्यालयात बोलावून राजीनामा देण्याच्या कारणावरून कुमठे यांना शिवीगाळ करून दमदाटी केली व राजीनामा न दिल्यास हात-पाय तोडून ठार मारण्याची धमकी दिली म्हणून जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दांडगे तपास करीत आहेत.

 गॅरेजमधून 35 हजारांचे साहित्य चोरीस

तुळजापूर रोडवरील उड्ड्णपूल येथील कॅनॉलशेजारी असलेल्या गुमटे वस्ती येथील बाबुराव रामण्णा सुतार (वय 61, रा. भवानी पेठ, तुळजापूर वेस, सेालापूर) यांचे गॅरेजचे पत्राशेड उचकटून चोरट्यांनी 34 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही चोरीची घटना गुरुवारी उघडकीस आली असून याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार पवार तपास करीत आहेत.

Tags : Solapur, case, filed, against, Riot