Tue, Apr 23, 2019 09:46होमपेज › Solapur › सोलापूर : हुंडा मागणाऱ्या तीन पोलिसांवर गुन्हा दाखल

‘प्लॉट दिला तरच लग्न करतो’ पोलिसाची मागणी

Published On: Dec 14 2017 11:42AM | Last Updated: Dec 14 2017 12:51PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

लग्नास नकार दिल्याने तीन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखरपुडा केल्यानंतर हुंडा दिला तरच लग्न करतो नाही तर लग्न करणार नाही म्हणून फसवणुक केल्याप्रकरणी हुंडाप्रतिबंधक कायद्यानुसार पोलिस दलातील तीन कर्मचार्‍यांसह पाचजणांविरुध्द सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस शिपाई सचिन राजस्थान पवार (नेमणूक- आरसीपी क्र. 1, सोलापूर शहर पोलिस), पोलिस हवालदार राजस्थान पवार (नेमणूक-पोलिस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण), महिला पोलिस शिपाई प्रिया राजस्थान पवार (नेमणूक- पोलिस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण), नंदाबाई राजस्थान पवार, नितीन राजस्थान पवार (रा. केशव नगर पोलिस लाईन, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मंगल रामजी काळे (वय 40, रा. सेटलमेंट कॉलनी नं. 1, पारधी कॅम्प, सोलापूर) या महिलेने फिर्याद दाखल केली आहे.

मंगल काळे यांची मुलगी प्रियंका रामदास काळे (वय 19) हिचा पोलिस शिपाई सचिन पवार याच्याशी २१ ऑगस्ट २०१६ रोजी रितसर मानपान देऊन साखर पुडा झाला आहे. त्यानंतर पोलिस शिपाई सचिन पवार, त्याचे वडील पोलिस हवालदार, महिला पोलिस शिपाई प्रिया पवार, नंदाबाई पवार, नितीन पवार यांनी लग्नासाठी एक लाख रुपये हुंडा आणि एक प्लॉट घेऊन दिला तरच लग्न करतो अशी अट घातली. त्यामुळे मंगल काळे यांनी पवार यांची भेट घेऊन अनेकदा चर्चा केली. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे याबाबत सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फसवणुक आणि लग्नासाठी हुंडा मागत असल्याची फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हवालदार राठोड करीत आहेत.