Mon, Jul 15, 2019 23:41होमपेज › Solapur › सोलापूर : राष्ट्रवादी तालुकाध्यक्षावर गुन्हा दाखल 

सोलापूर : राष्ट्रवादी तालुकाध्यक्षावर गुन्हा दाखल 

Published On: Apr 06 2018 6:56PM | Last Updated: Apr 06 2018 6:56PMमाढा : प्रतिनिधी

पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मोडनिंब (ता. माढा) रेथे गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत राष्ट्रवादीचे माढा तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी यांच्यासह तिघांवर बेकारदेशीरपणे दारु विक्री केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ हजार रुपये किंमतीची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकास गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून त्‍यांनी माढा तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास कमलाकर तोडकरी यांच्या मोडनिंब येथील मालकीच्या के. के. बिअर शॉपीमध्ये धाड टाकली असता या ठिकाणी बिअर विक्रीचा परवाना असताना देशी-विदेशी दारुचा १२ हजार तीस रुपयांचा बेकारदेशीर माल सापडला. त्याचप्रमाणे दादासाहेब बाळासाहेब पाटील यांच्या संकेत बिअर शॉपीत अशाचप्रकारे ९ हजार ७९८ रुपरे किंमतीचा, तर राजाराम कोंडिबा लोकरे यांच्या कृष्णा बिअर शॉपीत १ हजार १९० रुपये किंमतीचा देशी विदेशी दारूचा बेकारदेशीर साठा आढळून आला. 

या दुकानांचे मालक कैलास तोडकरी, दादासाहेब पाटील आणि राजाराम लोकरे यांना विशेष पथकाने रात्री सव्वाअकरा वाजता ताब्यात घेतले होते. याही कारवाईत विशेष पथकातील सहायक पोलिस निरीक्षक संदीप धांडे, पोलिस हेड कॉन्स्‍टेबल अंकुश मोरे, पोलिस कॉन्स्‍टेबल विलास पारधी, पोलिस कॉन्स्‍टेबल सागर ढोर-पाटील, पोलिस कॉन्स्‍टेबल बाळराजे घाडगे, अनुप दळवी, सचिन कांबळे, अमोल जाधव, महादेव लोंढे, अभिजित ठाणेकर यांनी भाग घेतला. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक फौजदार राठोड  करीत आहेत.

Tags : solapur temburni police, NCP madha taluka president