Thu, Jan 24, 2019 07:41होमपेज › Solapur › विवाहितेच्या छळप्रकरणी पाचजणांवर गुन्हा दाखल

विवाहितेच्या छळप्रकरणी पाचजणांवर गुन्हा दाखल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

पैशासाठी विवाहितेचा छळ करुन तिला त्रास दिल्याप्रकरणी पतीसह पाचजणांविरुध्द जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती वसीम, सासू बॉबी बशीर शेख, नणंद सना, हिना, चुलत नणंद तरन्नूम (रा. म्हाडा ग्राऊंड, मालवणी बस डेपोसमोर, मलाड वेस्ट, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सिमरन वसीम शेख (वय 21, रा. मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर) या विवाहितेने फिर्याद दाखल केली आहे.

मे 2015 पासून पती वसीम व त्याच्या घरातील लोकांनी सिमरन हिच्या घरच्या लोकांनी लग्नात चांगला मानपान केला नाही व हुंडा दिला नाही तसेच कर्ज फेडण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणून सिमरन हिचा शारीरिक व मानसिक छळ करुन तिला त्रास दिला म्हणून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक बनकर तपास करीत आहेत.

महिलेला तलवारीने मारणार्‍याविरुध्द गुन्हा दाखल

भांडण  सोडविण्यासाठी  आलेल्या महिलेच्या डोक्यात तलवारीने मारुन जखमी करणार्‍याविरुध्द सलगर वस्ती पोलिस  ठाण्यात  गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. विकास प्रकाश म्हमाणे (वय 30, रा. कवठे गाव) याच्या फिर्यादीवरुन शिवाजी श्रीरंग बंडगर (रा. कवठे गाव) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुरुवारी रात्री विकास म्हमाणे व शिवाजी बंडगर यांच्यात पत्त्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात विकास याची आई भांडण सोडविण्यास आली असता शिवाजी बंडगर याने लोखंडी तलवारीने ड ोक्यात  मारुन जखमी केले म्हणून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार गायकवाड तपास करीत आहेत.

Tags : Solapur, Solapur News, case, charge, 5 people, rape,  married women 


  •