Fri, Apr 19, 2019 11:58होमपेज › Solapur › सोलापूर : चालकाचा ताबा सुटल्याने अपघात: एक ठार

सोलापूर : चालकाचा ताबा सुटल्याने अपघात: एक ठार

Published On: Apr 06 2018 6:07PM | Last Updated: Apr 06 2018 5:32PMसोलापूर : प्रतिनिधी

भरधाव वेगाने जाणाऱ्या कारच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार झाडावर आदळल्याने एकजण जागीच ठार झाला, तर अन्य एक गंभीर जखमी आहे. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सोलापूर-पंढरपूर राज्य महामार्गावर पोखरपूर येथे झाला.

कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात अश्विन सुरवसे ( रा. मोहोळ ) हा जागीच ठार झाला तर चालक बाळू बिले ( रा. मोहोळ ) हा गंभीर जखमी झाला आहे. कार (एमएच १३ बीएन ६१२३) पंढरपूर कडून मोहोळ शहराकडे जात होती. यामध्ये बाळू बिले हा आपला मित्र अश्विन सुरवसे याच्यासह जात होता. भरधाव गाडी असल्याने बाळू बिले याचा गाडीवरील ताबा सुटल्याने पोखरपूरजवळ कार रस्त्याकडेच्या झाडावर अदळली. या अपघातामध्ये अश्विन सुरवसे हा जागीच ठार झाला तर बाळू बिले हा गंभीर जखमी झाला आहे. 
जखमी बिले यास उपचारासाठी सोलापूरमधील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.