Wed, Apr 24, 2019 19:44होमपेज › Solapur › सांगोला तालुक्याच्या हक्‍काचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळावे

सांगोला तालुक्याच्या हक्‍काचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळावे

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 15 2018 9:34PMसांगोला : तालुका प्रतिनिधी

नीरा उजवा कालव्यातून सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी प्रत्येक पाळीला पूर्ण क्षमतेने मिळाले पाहिजे. यापुढील काळात अन्याय सहन केला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका  आ. गणपतराव देशमुख, माजी आ. दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी घेतली.  मुंबईत नीरा उजवा कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक -निंबाळकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,  पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, आ. दत्तात्रय भरणे, आ. हणूमंत डोळस, आ. रामहरी रूपनवर, जलसंपदा विभागातील उच्चस्तरीय आधिकारी  अधीक्षक अभियंता चोपडे, कार्यकारी अभियंता सिदमल, माळशिरस, पंढरपूर सांगोलाचे सर्व उपअभिंयता उपस्थित होते.

नीरा-उजवा कालव्याच्या अस्तरीकरणाची कामे बहुतांशी पूर्ण झालेली असल्याने, अस्तरीकरणातून वाचणारे गळतीचे पाणी हे प्रकल्प अहवालामध्ये शाखा क्रं. 4 व 5 साठी असल्यामुळे शाखा क्र. 4 व 5 हे पूर्ण क्षमतेने प्रत्येक पाळीला चालले पाहिजेत. अस्तरीकरणामुळे गळतीचे वाचणारे पाणी शिल्लक आहे. ते पाणी पूर्ण क्षमतेने शाखा क्र.4 व 5 ला मिळालेच पाहिजे. त्यामध्ये आम्ही कोणतीही तडजोडीची भूमिका ऐकणार नाही, अशी आक्रमक बाजू त्याठिकाणी  आ. देशमुख आणि साळुंखे-पाटील यांनी मांडली.  

ऐन उन्हाळ्यामध्ये नीरा उजवा कालवा शाखा क्रं. 4 व 5 ला पाणी आल्यानंतर महूद, गायगव्हाण, खिलारवाडी, चिकमहुद, लक्ष्मीनगर, महिम, अजनाळे, य. मंगेवाडी, अचकदाणी या परिसरातील व सांगोला शहरातील काही भाग व शेती पाण्याखाली येणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंद व्यक्‍त केला जात आहे.