Sat, Jul 20, 2019 13:34होमपेज › Solapur › सोलापूर : राष्‍ट्रपुरुषाच्या अवमानाने मोहोळमध्ये संतापाची लाट; आज बंद

सोलापूर : राष्‍ट्रपुरुषाच्या अवमानाने मोहोळमध्ये संतापाची लाट

Published On: Jan 15 2018 9:47AM | Last Updated: Jan 15 2018 9:47AM

बुकमार्क करा

मोहोळ : प्रतिनिधी

राष्‍ट्रपुरुषांचा व मराठा समाजाचा आक्षेपार्ह भाषेत शिविगाळ करून व्‍हिडिओ व्‍हायरल केला गेल्याच्या निषेधात आज मोहोळमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मराठा समाजाच्या वतीने आज शहर व तालुका बंदचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मोहोळ शहरात तणावपूर्ण शांतता आहे. 

रविवारी सोशल मीडियावर मराठा समाज व राष्‍ट्रपुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्य करणारा व्‍हिडिओ व्‍हायरल झाला व अनेकांना मोबाईलवर आला होता. त्यामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली. विविध संघटनांचे पदाधिकारी व सकल मराठा समाज बांधव दुपारी पोलिस स्‍थानकात जाऊन याबाबत गुन्‍हे दाखल करण्यासाठी एकत्र आले होते. 

रविवारी सांयकाळी सात वाजता हजारो मराठा समाज बांधवाची बैठक कै शहाजीराव पाटील सभागृहात पार पडली. त्यानंतर सर्वांनी पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत फिर्याद दिली. महेश सुभाष देशमुख यांनी या व्हिडियो मधील व्यक्ती विरोधात फिर्याद दाखल केली.

पोलिस निरिक्षक राजेंद्र मस्के यांच्या दालनात मराठा समाजातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी  शिवसेना तालुका  प्रमुख संजय काका देशमुख, भाजप तालुका अध्यक्ष सतीश काळे, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजीराव चटके, बाळासाहेब गायकवाड, पद्माकर देशमुख, शिवसेना नगरसेवक सत्यवान देशमुख, राष्ट्रवादीचे नगरपरिषद गटनेते प्रमोद डोके, महेश देशमुख, राजरत्न गायकवाड, अॅड हेमंत शिंदे, अॅड श्रीरंग लाळे हे उपस्‍थित होते. 

आज, सोमवारी या घटनेच्या निषेधार्थ मोहोळ शहर व तालुका स्‍वयंस्‍फूर्तपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या प्रकारानंतर मोहोळ शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी मोठा फौज फाटा तैनात केला आहे.