होमपेज › Solapur › मुख्यमंत्र्याच्या संवादाची ‘ती’ व्हिडिओ क्‍लिप व्हायरल(व्हिडिओ) 

मुख्यमंत्र्याच्या संवादाची ‘ती’ व्हिडिओ क्‍लिप व्हायरल(व्हिडिओ) 

Published On: Jul 23 2018 2:03PM | Last Updated: Jul 23 2018 2:03PMमंगळवेढा तालुका प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढ्यातील  (माचणुर) आंदोलकांशी रविवारी सकाळी १० वाजता फोनवर साधलेल्या संवादाची व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना आंदोलकांनी मंगळवेढ्यात आढविल्‍यांनतर तयांनी हा फोन मुख्यमंत्र्याना लावला होता. त्यात मुख्यमंत्र्यांनी शासनाची बाजू मांडत आंदोलन कर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, आंदोलकांनी आता आम्ही गप्प बसणार नाही, अशी भूमिका घेत सहकारमंत्री यांच्या आरक्षण पुढील वर्षी नाही मिळाले तर मी मंत्रीपदाचा राजीनामा देणार या वक्तव्याचा खरपुस समाचार घेतला. 

या फोनवरून आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना आपण पुजेला येऊच नका असा सल्ला दिला. यानंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकभावना तीव्र झाल्याचा अंदाज घेत शासकीय पुजेला न येण्याचा निर्णय  घेतला असल्याचे लक्षात येते.