Thu, Apr 25, 2019 14:11होमपेज › Solapur › सोलापूर : चालता ट्रक पेटला; जीवितहानी नाही(Video)

सोलापूर : चालता ट्रक पेटला; जीवितहानी नाही(Video)

Published On: Apr 24 2018 11:25PM | Last Updated: Apr 24 2018 11:24PMसोलापूर :

आंध्रप्रदेश हुजुरनगरहुन मुंबईला जाणाऱ्या माल ट्रकला बोरामणी जवळ आग लागली. यात ट्रक पूर्णपणे जळून भस्मसात झाला असून लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही. ही घटना रात्री 8 ते 9 च्या सुमारास घडली.

हैदराबाद रोडवरील बोरामणीजवळील कीर्ती गोल्ड कारखान्यासमोर आंध्रप्रदेशमधील हुजुरनगरहुन मुंबई ला जाणाऱ्या माल ट्रकला आग लागली. इलेक्ट्रॉनिक कारणाने इंजिनमध्ये लागली आहे कळताच चालक शब्बीर खान याने गाडी बाजूला थांबवली व तात्काळ उडी टाकली. गाडीतून उतरताच काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण करत चहूबाजूंनी पेट घेतला. आगीचे तांडव मोट्या प्रमाणात चालू होते. त्यानंतर चालक खान यानेे तात्काळ अग्निशामक दलास फोन करून कळवले. अग्निशामक दल 30 मिनिटांनी घटनास्थळी पोहचले व आगीवर नियंत्रण आणण्यात आले.

या ट्रकमध्ये एक्स्पोर्ट कापूस वाहून नेण्यात येत होता. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले असल्याचे सांगण्यात आले.

Tags :solapur, solapur news, truck, burning truck