Fri, Feb 22, 2019 07:28होमपेज › Solapur › सहकारमंत्र्यांना आयुक्तांचे पत्र

सहकारमंत्र्यांना आयुक्तांचे पत्र

Published On: Mar 07 2018 9:35AM | Last Updated: Mar 06 2018 9:33PMसोलापूर  : प्रतिनिधी 

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आरक्षित जागेत घर बांधल्याप्रकरणी महापालिका आयुक्त 17 मार्च रोजी सुनावणी घेणार आहेत. या सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी मनपाकडून बुधवारी ना. देशमुख यांना पत्र देण्यात येणार आहे. ना. देशमुख यांनी होटगी रोडवर अग्निशमन दलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर घर बांधल्याची तक्रार आहे. याबाबत महेश चव्हाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती केमकर यांनी  याप्रकरणी 10 ऑगस्ट 2016 रोेजी तीन महिन्यांत सुनावणी घेऊन निर्णय देण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. तीन महिन्यांच्या कालावधीत  मनपाने याविषयी न्यायालयाला काहीच उत्तर 

 दिले नाही. याविरोधात अण्णाराव भोपळे  यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. यावर 16 मार्च रोजी न्यायमूर्ती अभय ओक यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. दरम्यान, याबाबत भोपळे यांचे वकील चैतन्य निकते यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून विचारणा केली आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे 17 मार्च रोजी सुनावणी घेणार आहेत. याअनुषंगाने सुनावणीस उपस्थित राहण्याविषयी ना. सुभाष देशमुख यांना बुधवारी पत्र देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.