Wed, Nov 14, 2018 21:23



होमपेज › Solapur › सोलापूर : बार्शीत शेतीच्या वादातून सख्या भावाचा खून

सोलापूर : बार्शीत शेतीच्या वादातून सख्या भावाचा खून

Published On: Jul 05 2018 10:55AM | Last Updated: Jul 05 2018 10:55AM



बार्शी : तालुका प्रतिनिधी 

हात्तीज (ता. बार्शी) येथे शेतीच्या वादातून सख्या भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. बार्शी तालुक्यात जमिनीच्या वादातून खुनाची मालिका सुरू आहे. गुरूवारी पहाटे अडीच वाजता ही घटना घडली. डोक्‍यात लोखंडी घन घालून भावाला ठार करण्यात आले. या आठवड्यातील सख्या भावाकडून खून झाल्याची ही दुसरी घटना आहे. 

याप्रकरणी वैराग पोलिसांनी तक्रार नोंद केली आहे.