Wed, Aug 21, 2019 06:07होमपेज › Solapur › बार्शी येथे बापानेच केला मुलाचा खून

बार्शी येथे बापानेच केला मुलाचा खून

Published On: Jul 16 2019 12:02AM | Last Updated: Jul 16 2019 2:01AM
बार्शी : तालुका प्रतिनिधी 

दारूच्या आहारी गेलेल्या स्वतःच्या मुलाचा जन्मदात्या बापानेच गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

करून खुनाचा प्रकार लपवण्यासाठी मुलाने आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचा प्रकार बार्शी शहरात उघडकीस आला आहे. पोपट चंद्रकांत जगदाळे (वय ३५, रा. चव्हाण प्लॉट, उपळाई रोड, बार्शी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. 

याप्रकरणी मुलाचे वडील चंद्रकांत राजाराम जगदाळे याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कॉन्स्टेबल गोरख भोसले यांनी याबाबत बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी तपास केला.