Sun, Jul 21, 2019 09:52होमपेज › Solapur › मराठा, धनगर समाजाचा बहिष्कार, वाट पाहून पालकमंत्री परतले(व्हिडिओ)

मराठा, धनगर समाजाचा बहिष्कार, वाट पाहून पालकमंत्री परतले(व्हिडिओ)

Published On: Jul 20 2018 12:42PM | Last Updated: Jul 20 2018 3:23PMपंढरपूर : प्रतिनिधी

मराठा, धनगर आरक्षण आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख पंढरीत आले होते मात्र त्यांच्या बैठकीवर दोन्ही समाजाच्या आंदोलकांनी बहिष्कार टाकला आहे. 3 तास वाट पाहून शेवटी पालकमंत्री परत गेले. दरम्यान पालकमंत्री देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की आषाढी एकादशी च्या परंपरा पाळली जावी. सरकारने दोन्ही समाजाच्या चर्चा करायची तयारी दाखवली आहे. मुख्यमंत्री महापूजेला येणार आहेत. असेही देशमुख म्हणाले. 

मराठा, धनगर आरक्षणावरून निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक करण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख पंढरीत आले होते. मात्र,  पालकमंत्र्यांच्या बैठकीवर मराठा, धनगर समाजाने बहिष्कार टाकल्यामुळे पालकमंत्री शासकीय विश्राम गृहात प्रतिक्षा करीत बसलेले होते.

आरक्षणाची घोषणा केल्याशिवाय आषाढी यात्रेच्या शासकीय महापूजेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी येऊ नये, त्यांना महापूजा करू देणार नाही. असा इशारा  मराठा क्रांती मोर्चा आणि धनगर आरक्षण कृती समितिने दिला आहे. यामुळे 4 दिवसांपासून पंढरीत तणाव निर्माण झाला आहे. 4 बस गाड्यांची तोडफोडही करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख शुक्रवारी सकाळी 11 वाजता पंढरपुरात दाखल झाले होते. त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक विरेश प्रभू आले होते मराठा आणि धनगर आरक्षण आंदोलकांना बैठकीचे आमंत्रण दिले होते. मात्र, एकही कार्यकर्ता बैठकीकडे फिरकला नाही. त्यामुळे तीन तास वाट पाहून शेवटी पालकमंत्री परत गेले.