Wed, Nov 21, 2018 03:08होमपेज › Solapur › बालसुधारगृहामधून पळालेला मुलगा कुर्डुवाडीत ताब्यात

बालसुधारगृहामधून पळालेला मुलगा कुर्डुवाडीत ताब्यात

Published On: Feb 01 2018 11:22PM | Last Updated: Feb 01 2018 9:27PMसोलापूर/कुर्डुवाडी : प्रतिनिधी

सिव्हिल हॉस्पिटलजवळ असलेल्या बालसुधारगृहा मधून पळून जात पुण्याच्या दिशेने निघालेल्या 12 वर्षाच्या मुलास कुर्डुवाडी येथे आरपीएफ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुभम मल्हारी व्हनमाने असे मुलाचे नाव आहे. 

शुभमचे अपहरण  केल्याप्रकरणी बुधवारी अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुभम व्हनकडे यास बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. 29 जानेवारी रोजी दुपारी शुभम बालसुधारगृहात आढळून आला नाही. त्यामुळे त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही. त्यामुळे त्याचे कुणीतरी अपहरण केले असावे म्हणून याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक एस.बी. राठोड तपास करीत आहेत.

दरम्यान, सोलापूर येथील बालसुधारगृहातील शुभम मल्हारी व्हनमाने हा त्रासाला कंटाळून पॅसेंजर गाडीने पुण्याकडे निघाला होता. रेल्वेच्या डब्यात तो एकटाच मुलगा बावरलेला होता. सहप्रवाशाने कुर्डुवाडी रेल्वेस्थानकावर हा प्रकार आरपीएफ पोलिसांच्या ध्यानात आणून दिला. आरपीएफ पोलिसांनी त्या मुलाला रेल्वेमधून उतरून पोलिस ठाण्यात आणले. त्या मुलाने यानंतर पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. आरपीएफ पोलिसांनी सोलापूर बालसुधारगृह कार्यालयाशी संपर्क साधून शुभम व्हनमानेे यास त्यांच्या ताब्यात दिले. पोलिस हवालदार गोरे, गुज्जर, इनस्पेक्टर नेटके यांनी याकामी मोलाची मदत केली.