Thu, Jan 24, 2019 05:37होमपेज › Solapur › भाजपच्या गुजरात यशाबद्दल माळशिरस तालुक्यात जल्लोष 

भाजपच्या गुजरात यशाबद्दल माळशिरस तालुक्यात जल्लोष 

Published On: Dec 19 2017 2:06AM | Last Updated: Dec 18 2017 9:05PM

बुकमार्क करा

माळशिरस : तालुका प्रतिनिधी

नुकत्याच पार पाडलेल्या गुजरात व हिमाचल प्रदेशाच्या राज्याच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील भाजपला मिळालेल्या यशाबद्दल माळशिरस तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. नातेपुते, पिलीव, वेळापूर येथे कार्यकर्त्यांना आनंदोत्सव साजरा केला.

 पिलीव येथे पिलीव जिल्हा परिषद गटाच्या कार्यकर्त्यांनी फटक्याची आतिषबाजी करीत जल्लोषात केला. यावेळी पिलीव जिल्हा परिषद गटाचे प्रमुख राहुल मदने, संतोष पडळकर, सालर पठाण, करण काळे, वैभव वगरे, प्रदीप करांडे, सदा मदणे, सचिन भैस आदींसह भाजपचे कार्यकर्त्ये आनंद उत्साहात सहगी झाले होते. गुजरात व हिमाचल प्रदेश मधील भाजपला मिळालेल्या यशाबद्दल नातेपुते शहर भाजपाच्यावतीने येथील अण्णा भाऊ साठे चौकात फटाके फोडून व एकमेकांना पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.  या दोन्ही राज्यातील निकाल जाहीर झाल्यावर दोन्ही ठिकाणी भाजप सत्ता स्थापन करणार हे निश्चित झाले. नातेपुते येथील भाजपाचे नेते दादासाहेब उराडे, हनुमंतराव धालपे, बाळासाहेब सरगर, पं. स. सदस्य माऊली पाटील, कृ. उ. बा. समितीचे संचालक सुधीर काळे, शहर अध्यक्ष भैय्या चांगण, संदिप ठोंबरे, प्रवीण काळे, अतुल पाटील,  संजय उराडे, किशोर पलंगे, संजय गांधी, सचिन भोजणे, सदाशिव दोलतोडे, देविदास काळे, सागर बोराटे, अविनाश देवकर, हनुमंत कर्चे यांनी फटाके वाजवून व एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला.