Sun, May 26, 2019 16:54होमपेज › Solapur › एसटी जाळण्याचा प्रयत्न

एसटी जाळण्याचा प्रयत्न

Published On: Jan 03 2018 1:18AM | Last Updated: Jan 02 2018 11:08PM

बुकमार्क करा
श्रीपूर : वार्ताहर 

आमचा श्रीपूरचा वार्ताहर कळवतो की, भीमा कोरेगाव येथे  झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीपूर (ता. माळशिरस) येथे सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्‍तींकडून एसटी बस फोडून जाळण्याचा प्रयत्न झाला व रस्त्यावर टायर पेटवून काही वेळ वाहतुकीची  कोंडी करण्यात आली. घटनास्थळी पोलिस  वेळेवर पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.

श्रीपूर मधील सकाळी सर्व दुकाने चालू होती; परंतु अचानक नऊ वाजण्याच्या सुमारास जमावाने एकत्र आलेल्या युवकांनी श्रीपूर बंद करण्याचे आवाहन करत सर्व दुकाने बंद केली.त्यानंतर काही अज्ञातानी आंबेडकर व शिवाजी चौकात मुख्य रस्त्यावर  टायर पेटवून वाहतूक थांबवली.

दरम्यान, श्रीपूरमधून राज्य परिवहन महामंडळाची मिनी एसटी बस अकलूजला जात असताना थांबवून तिच्यावर दगडफेक करत काचा फोडल्या. त्यानंतर पेटता टायर आत टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेचे माहिती होताच श्रीपूर औट पोस्टचे पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी पाण्याचा मारा करून एसटीमधील टायर विझवले व पुढील होणारा अनर्थ टाळला. या घटनेने श्रीपीरमध्ये काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे दिवसभर श्रीपूरमध्ये पोलिस बंदोबस्त होता.