Wed, Jul 24, 2019 12:08होमपेज › Solapur › उद्या पंढरपूर बंदचे आवाहन

उद्या पंढरपूर बंदचे आवाहन

Published On: Jan 03 2018 1:18AM | Last Updated: Jan 02 2018 11:28PM

बुकमार्क करा
पंढरपूर : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव (जि.पुणे) येथे सोमवारी झालेल्या दगडफेक प्रकरणाचा निषेध म्हणूने उद्या (गुरुवार, दि. 4 रोजी) पंढरपूर बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे. यासंदर्भात मंगळवारी पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

सोमवारी भीमा-कोरेगाव येथे  शौर्य दिवसाच्या 200 वर्षपूर्ती सोहळ्यास उपस्थित झाल्यानंतर परतणार्‍या वाहनांवर आणि नागरिकांवर झालेल्या दगडफेकीदरम्यान एक जणाचा मृत्यू झाला असून लहान मुले, महिलाही दगडफेकीत जखमी झालेले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करीत निषेध नोंदवण्याकरिता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. 

यावेळी 3 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्यामुळे 4 जानेवारी रोजी पंढरपूर बंद ठेवण्याचा निर्णय सर्व संमतीने घेण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून संपूर्ण शहरातून मोर्चा काढून तहसीलदारांना या निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या बैठकीचे वृत्त समजताच सहायक पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी सर्व पदाधिकार्‍यांशी चर्चा केली आणि शांततेत बंद करण्याचे आवाहन केले.