Fri, Apr 26, 2019 19:28होमपेज › Solapur › माणनदी व कॅनॉल क्षेत्रातील शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज  भरावे : आ. भालके 

माणनदी व कॅनॉल क्षेत्रातील शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज  भरावे : आ. भालके 

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 11:03PM

बुकमार्क करा
पंढरपूर  : प्रतिनिधी

 उजनी धरणातील सन 2017-18 मधील रब्बी हंगामाची कालवा सल्लागार समितीची बैठक बुधवारी मंत्रालय येथे पार पडली. या बैठकीत उजनी धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणी माण नदीला आणि कॅनॉलला सोडण्यात येणार असून या भागात असणार्‍या गांवातील शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज फॉर्म 6 नमुन्याचा फॉर्म विभागीय कार्यालयात त्वरित भरावेत असे आवाहन आ. भारत भालके यांनी केली आहे.

या बैठकीला पालकमंत्री ना. विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री  विजयकुमार देशमुख, आ. भारत भालके, आ. बबनदादा शिंदे, सह.मुख्य अभियंता विलास रजपूत , अधीक्षक अभियंता  शिवाजी चौगुले, कार्यकारी अभियंता नारायण जोशी, जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.

सदर मिटिंगमध्ये कॅनॉल व माण नदीला पाणी सोडण्याचा निर्णय झाला असल्याने या भागातील शेतकर्‍यांना या पाण्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. 
पाण्याची मागणी संबंधित शेतकर्‍यांनी त्वरीत करणे गरजेचे असून पाणी मागणीचे अर्ज शेतकर्‍यांनी वेळेत न भरल्यास व पूर्ण मागणी न झाल्यास शेतकर्‍यांचे हक्काचे पाणी इतरत्र वळविले जाऊ शकते. त्यामुळे या कॅनॉलवर आधारीत असणार्‍या गांवातील शेतकर्‍यांनी तत्काळ पाणी मागणी अर्ज भरावेत अशी विनंती आ.भारत भालके यांनी केली आहे.