Sat, Jul 20, 2019 08:35होमपेज › Solapur › पाण्यासाठीचा लढा पाणी मिळेपर्यंत थांबवणार नाही : आ. भारत भालके

पाण्यासाठीचा लढा पाणी मिळेपर्यंत थांबवणार नाही : आ. भारत भालके

Published On: Jul 02 2018 1:50AM | Last Updated: Jul 01 2018 10:56PMमंगळवेढा : तालुका  प्रतिनिधी

श्रेय खुशाल कुणीही घ्या मात्र या भागाला दिलेला शब्द मी पूर्ण करेपर्यंत पाण्यासाठीचा लढा पाणी मिळेपर्यंत थांबवणार नाही असे प्रतिपादन आ. भारत भालके यांनी पत्रकार परिषदेत केले.  

यावेळी आ. भालके यांनी पाण्याच्या प्रश्‍नाबाबत तालुक्यातील काहीजण जाणीवपूर्वक चेष्टा करीत आहेत पंढरपुरातून काही महाभाग या योजनेला दुर्बिणीतून पाहत आहेत. त्यांनी मनापासून प्रयत्न केले असते तर ही योजना पाच वर्षांपूर्वी मार्गी लागली असती असेही सांगितले.

उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या वेळेच्या निर्बंधामुळे राज्यसरकारने या उपसा सिंचन योजनेलामंत्री मंडळाच्या बैठकीत फेररचनेसह सुधारित प्रशासकीय मंजुरी दिली. 

ही योजना कधी पूर्णत्वास येणार, यासाठी किती खर्च होईल, किती गावांना लाभ होणार, किती क्षेत्र ओलिताखाली येणार याबाबत राज्य सरकार आपले म्हणणे उच्च न्यायालयात सादर करणार असून यानंतर न्यायालय यावर निर्णय देणार आहे. त्यानंतर पुढील भूमिका ठरवता येणार आहे असे आ. भारत भालके यांनी सांगितले. 

अनेक वषार्ंपासून या पाण्याच्या लढ्यासाठी इथली जनता दाद मागत होती. तालुका बंद करून निवडणुकीवर बहिष्कार  टाकत होती. उच्च न्यायालयात जनहित याचिका या माध्यमातून दुष्काळी लोकांनी प्रयत्न केले.  गेल्या पंधरा वर्षात पश्‍चिम महाराष्ट्रात एकही योजना  विदर्भाच्या अनुशेषामुळे मंजूर झाली नव्हती मात्र तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मदतीने राज्यपालांकडून खासबाब म्हणून  530 कोटी रुपयांच्या उपसासिंचन   या योजनेला मंजुरी मिळवली. परंतु या योजनेस विद्यमान सरकारने आडकाठी आणल्याने या भागातील लोकांनी उच्च न्यायलायात जनहित याचिका दाखल करून पाठपुरावा केला. 

खरे पाहता मंत्रिमंडळाच्या बैठकीअगोदर संबंधित खात्याकडून कॅबिनेट समोर मांडल्या जाणार्‍या विषयाची सचिव पातळीवर माहिती घेऊन हे विषय बैठकीत मांडले जातात. त्यानुसार  गावांच्या पाण्याचा विषय शासनाला कार्यवाही बाबतच्या पत्रान्वये घेण्यात आला. मी आणि गणपतआबानी येत्या अधिवेशनात लोकशाहीच्या आयुधाचा वापर करत विधिमंडळात दुष्काळी अडचणीच्या सर्व प्रश्‍नावर आवाज उठवण्याबाबत रणनीती ठरवली आहे.  

या वेळी भुजंगराव पाटील, प्रकाश गायकवाड़, रतचचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, अ‍ॅड़. सुजीत कदम, तानाजी खरात, पांडुरंग चौगुले, रामचंद्र जगताप, काशीनाथ पाटील, भारत पाटील, भारत बेदरे, तानाजी काकड़े, बसवराज पाटील, रामचंद्र मळगेसह मान्यवर उपस्थित होते.