Sun, May 26, 2019 10:36होमपेज › Solapur › मेमध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी मिळेल : आ. भारत भालके

मेमध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी मिळेल : आ. भारत भालके

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:28PM

बुकमार्क करा
मंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील पड़ोळकरवाडी, लोणार, महमदाबाद(हु), हुन्नूर  मारोळी, चिक्कलगी, शिरनांदगी, सलगर बू, सलगर खु, जंगलगी, बावची या गावांना म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतुन मे पर्यंत पाणी मिळणार असल्याची माहिती आ. भारत भालके यांनी दिली.

 बैठकीत आ. भारत भालके यांनी या कामाला गती देण्याबाबत मंत्री महोदयाकड़े मागणी केल्याने संबंधित अधिकारी वर्गास तत्काळ कामाची गती वाढवण्यासाठी आदेश दिल्याने  येत्या उन्हाळ्यात दुष्काळी भागाला पाणी मिळणे शक्य होणार आहे. 

बुधवारी सांयकाळी चार वाजता मंत्रालयात कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. वितरिका क्र. 1द्वारे मंगळवेढा तालुक्याला पाणी मिळणारआहे. वितरीकेचे काम सुरू असून 66.330 किमी मध्ये असलेल्या 15 कॉलमच्या जलसेतूचे काम दर महिन्यास 2 कॉलम प्रमाणे  सुरू आहे. यापेक्षा 4 कॉलम महिन्यात झाले तर एप्रिलपर्यंत काम पूर्ण होऊन त्या भागाला गरजेच्या काळात पाणी मिळेल. 
  या बैठकीस  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. भारत भालके, आ. अनिल बाबर, आ. सुरेश खाडे, माजी आ. दीपक साळुखे, समाधान आवताडे  यांच्या सह मुख्य अभियंते टी. एन. मुंढे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुनाले, कार्यकारी अभियंता विजय पाटील उपस्थित होते.