Wed, Apr 24, 2019 16:27होमपेज › Solapur › बेळगावच्या दोन डॉक्टरांसह तिघांवर सोलापुरात गुन्हा दाखल

बेळगावच्या दोन डॉक्टरांसह तिघांवर सोलापुरात गुन्हा दाखल

Published On: Feb 27 2018 8:21AM | Last Updated: Feb 26 2018 8:42PMसोलापूर : प्रतिनिधी

पोटगीच्या   कारणावरून   मेव्हण्यास शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी बेळगावच्या डॉक्टर बाप-लेकांसह तिघांविरुध्द सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डॉ. उल्हास उमेश यडूर (वय 37), डॉ. उमेश भीमण्णा यडूर  (64), प्रशांत उमेश यडूर (33, तिघे रा. हनुमाननगर, हिंदवाडी, बेळगाव, कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत शिवप्पा अर्जुन कुंभार (वय 32, रा. पद्मानगर, अक्कलकोट रोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. 

शिवप्पा कुंभार यांची बहीण व उल्हास यडूर यांचा विवाह झाला होता.  त्यानंतर उमेश यडूर व त्यांच्या पत्नीमध्ये वादावादी झाल्याने त्यांच्या पत्नीने न्यायालयात पोटगीचा दावा केला  होता. न्यायालयाने तो मान्य करीत उमेश यडूर यांनी पोटगी देण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे यडूर कुटुंबीय कुंभार यांच्यावर चिडून होते.  त्यातून यडूर कुटुंबीय कुंभार यांना फोनवरून शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी  देत  होते. कुंभार यांच्या  बहिणीने  न्यायालयात वसुलीचा अर्ज मागे  घ्यावा  म्हणून यडूर  कुटुंबीय कुंभार यांना त्रास देत होते. 26 सप्टेंबर  रोजी उल्हास व उमेश यांनी फोन करून अश्‍लील शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. मोबाईलमधील हे संभाषण कुंभार यांनी रेकॉर्ड केले व त्याची सीडी पोलिसांना दिली. अत्यंत अश्‍लील भाषेत यडूर यांनी कुंभार यांना शिवीगाळ करून धमकी दिली म्हणून कुंभार यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार कांबळे तपास करीत आहेत.