Fri, Apr 26, 2019 19:53होमपेज › Solapur › योग शिबिराच्या माध्यमातून अपंग मुलीची बोटे झाली सरळ

योग शिबिराच्या माध्यमातून अपंग मुलीची बोटे झाली सरळ

Published On: Mar 17 2018 11:28PM | Last Updated: Mar 17 2018 11:11PMअक्कलकोट : वार्ताहर
अक्कलकोट येथे होत असलेल्या योगचिकित्सा व ध्यान शिबिरासाठी आलेल्या वैद्यकांनी कर्नाटकातील एका अठरा वर्षीय अपंग मुलीवर अ‍ॅक्युप्रेशर उपचार करुन तिची वाकडी असलेली बोटे सरळ केली. या उपचाराचा लगेच परिणाम दिसून आल्याने तालुक्यातून कौतुक होत आहे.

विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित 17 ते 19 मार्च रोजी होणार्‍या योगगुरु रामदेव बाबा यांच्या सान्निध्यात योग, ध्यान व चिकित्सा शिबिर होत आहे. त्या शिबिरातील शिबिरार्थी उपचार करण्यासाठी हरिव्दारहून आलेल्या बहुसंख्य वैद्यकांनी अक्कलकोट तालुक्यातील नागरिक, महिला व आबालवृध्दांवर नि:शुल्क अ‍ॅक्युप्रेशरचा उपचाराव्दारे उपचार केल्याने शेकडोजणांना गुण आल्याने तालुकावासियांतून समाधान व्यक्त केले जात आहे. या गुणकारांमध्ये कर्नाटकातील वाडीजंक्शन (ता.चितापूर, जि. कलबुर्गी) येथील नंदिनी गोविंद चव्हाण या अठरा वर्षीय युवतीला तिचा जन्म झाल्यानंतर बाळ अशक्त असल्याचे कारण सांगून एका डॉक्टराने नंदिनीच्या हातास व पायास तब्बल 21 दिवस सलाईन लावून उपचार केले होते. 

परंतु कालांतराने नंदिनीचा उजवा हात व पाय निष्क्रिय झाल्याचे त्यांच्या कुटुंबियांना कळले. त्यानंतर त्या कुटुंबियांनी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील विविध ठिकाणी उपचार घेतले असता त्यावर कोणताच परिणाम झालेला नव्हता म्हणून अक्कलकोट येथील नंदिनीचे मामा श्रीकांत राठोड यांनी अक्कलकोट येथे बोलावून घेऊन योग शिबिरातील वैद्यकांना दाखविले असता त्यांनी नंदिनीस शिबिराच्या ठिकाणी फत्तेसिंह क्रीडांगणावर अ‍ॅक्युप्रेशरव्दारे पंधरा मिनिटे उपचार केले असता गेल्या अनेक दिवसांपासून आखडलेले हात-पाय आपोआप हालचाल करायला लागल्याने नंदिनीचे मामा श्रीकांत राठोड व तिच्या आईस आनंदाचे अश्रू अनावर झाले होते.

 

Tags : solapur news, akkalkot,  yoga exercise, help handicap, yoga benefits