Wed, Feb 20, 2019 10:56होमपेज › Solapur › डुक्‍करांच्या त्रासाला कंटाळून पोलिसात तक्रार

डुक्‍करांच्या त्रासाला कंटाळून पोलिसात तक्रार

Published On: Jan 01 2018 2:09AM | Last Updated: Dec 31 2017 8:34PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

मोकाट डुक्‍करांच्या त्रासाला कंटाळून विजापूर नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बसून सुनकप्पा अण्णारेड्डी या वराह पाळणार्‍या व्यक्‍तीविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

पवन गणपत वाघमारे (वय 43, रा. सोनीनगर, रेवणसिध्दनगर, विजापूर रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. यामधील हकीकत अशी की, वराह पाळणार्‍या व्यक्तीने लहान- मोठ्या डुक्‍कर या प्राण्यांची दिवसा व रात्री ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था न केल्याने रस्त्यांवर मोकाट सोडल्याने  नागरिकांना अडथळा व त्रास व शारीरिक धोका निर्माण झाला, अशी नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. अधिक तपास पोना मुलाणी करत आहेत.

दरम्यान, विजापूर रोड परिसरात मागील काही दिवसांपासून डुक्‍करांचा मोठ्या प्रमाणात त्रास सर्वसामान्यांना होत आहे. मनपा कर्मचार्‍यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडूनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.