Mon, Dec 17, 2018 16:23होमपेज › Solapur › बार्शीच्या ओंकार धारूरकरचे यूपीएससी परीक्षेत यश

बार्शीच्या ओंकार धारूरकरचे यूपीएससी परीक्षेत यश

Published On: Apr 27 2018 10:27PM | Last Updated: Apr 27 2018 10:27PMबार्शी : प्रतिनिधी 

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. येथील ओंकार उर्फ महादेव बाळकृष्ण धारूरकर याने या परीक्षेत देशभरातून ८५७ व्या रँकचे यश संपादन केले आहे. इयत्ता दहावी बोर्डच्या परीक्षेतही त्यास अपंग संवर्गातून राज्यात प्रथम क्रमांकाचे यश मिळाले होते. 

बार्शीतील सुलाखे हायस्कूल येथे त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण तर श्री शिवाजी महाविद्यालय येथे बारावीचे शिक्षण घेतले. तर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे येथे मेकॅनिकल विषयातील बीटेक हे अभियांत्रीकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्याने यूपीएससी परीक्षेत यश संपादित केले. 

मंगळवेढ्याचा विक्रांत मोरे राज्यात १५ वा

यूपीएससी परीक्षेत मंगळवेढ्याचा विक्रांत सहदेव मोरे याला देशात ४३० वा क्रमांक मिळाला. तर राज्यात १५ व्या क्रमांकाचे यश त्याने संपादित केले आहे. 

Tags : solapur, barshi, upsc exam, onkar dharurkar