Tue, Apr 23, 2019 06:42होमपेज › Solapur › कळंबवाडीत दोन घरफोड्या; सात तोळे दागिने लंपास

कळंबवाडीत दोन घरफोड्या; सात तोळे दागिने लंपास

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 17 2018 10:12PM

बुकमार्क करा
बार्शी : तालुका प्रतिनिधी 

कळंबवाडी (ता. बार्शी) येथे  सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरासह एकाच रात्रीत दोन घरे फोडून सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्‍कम चोरून नेल्याची घटना कळंबवाडी (ता. बार्शी) येथे  उघडकीस आली. 

3चांगदेव लिंबराज मुंढे, राजाराम जालिंदर मुंढे अशी घरफोड्या झालेल्या शेतकर्‍यांची नावे आहेत. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सोलापूर येथून श्‍वानपथक मागवण्यात  आले होते; मात्र श्‍वानास चोरट्यांचा माग काढण्यात  यश आले नाही. 
सेवानिवृत्त शिक्षक चांगदेव लिंबराज मुंढे यांनी पांगरी पोलिसांत चोरीची फिर्याद दिली आहे. चांगदेव मुंढे यांची पत्नी माळशिरस येथे नोकरीस, तर मुलगा व सून हे बार्शी येथे नोकरीस असल्यामुळे ते एकटेच

कळंबवाडी येथे राहतात. रात्री अकरा वाजता शेतातील ते पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. चोरट्यांनी कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड असा 61,400 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर चोरट्यांनी राजाराम जालिंदर मुंढे यांच्या घराकडे मोर्चा वळवून घरातून रोख सहा हजार रुपये लंपास केले. चोरट्यांनी लक्ष्मण तुकाराम मुंढे यांच्या घराचा दरवाजा उघडून चोरीचा प्रयत्न केला. चांगदेव मुंढे यांनी पांगरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.