Sun, May 19, 2019 14:44
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › बार्शीत विवाहितेवर बलात्कार

बार्शीत विवाहितेवर बलात्कार

Published On: Mar 08 2018 11:00PM | Last Updated: Mar 08 2018 9:30PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

घरासमोरच्या अंगणात झोपलेल्या विवाहित महिलेस इंडिका कारमधून जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्यावर सलग बारा दिवस जबरी बलात्कार केल्याची घटना तुळजापूर, कळंब (जि.उस्मानाबाद), जामगाव (ता. बार्शी)  येथे घडली. जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी एकावर व बलात्कार करण्यास मदत केल्याप्रकरणी बेलगाव व आगळगाव येथील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर हरिदास तावरे, रा. बेलगाव असे अत्याचार केल्याप्रकरणी तर गणेश शेळके रा. बेलगाव, ता. बार्शी व भैय्या थिटे रा. आगळगाव अशी दुष्कर्म करण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. किशोर तावरे यास पांगरी पोलिसांनी तातडीने अटक करून बार्शी न्यायालयात उभे केले असता त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

  याबाबत संबंधित 23 वर्षीय विवाहित पीडितेने पांगरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी जेवणखान उरकुन त्या पती व मुलांसह त्यांच्या घरासमोरच्या अंगणात झोपल्या होत्या. दरम्यान, मध्यरात्री रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीस गेट उघडल्याचा आवाज आल्यामुळे त्या जाग्या झाल्या. तेव्हा  गावातील किशोर तावरे, गणेश शेळके व भैय्या थिटे हे फिर्यादीस दिसले. तावरे याने फिर्यादीजवळ जाऊन तोंड दाबून तिघांनी मिळून पीडित विवाहितेस  उचलून  इंडिका गाडीमध्ये नेऊन बसवले.तेव्हा अनोळखी इसम गाडी चालवत होता. इंडिकामध्ये जबरदस्तीने बसवून बार्शी बसस्थानकावर आल्यावर गणेश शेळके हा इंडिकामधून उतरून निघून गेला. भैय्या थिटे व किशोर तावरे यांनी गाडी तुळजापूर येथील लॉजवर घेऊन गेले. तेथे गेल्यावर किशोर तावरे याने पीडितेवर जबरदस्तीने संभोग केला. कोणाला सांगितल्यास मुलाला व नवर्‍यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याच गाडीतून कळंब व जामगाव येथील लॉजवर घेऊन जाऊन किशोर तावरे याने जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच आपण स्वतः निघून गेले असल्याबाबत जबाब देण्यासाठी फिर्यादीस धमकावून पांगरी पोलिस ठाण्यात आणून सोडले.जबाब दिल्यानंतर फिर्यादीचा पती पोलिस ठाण्यात आल्यावर व पीडित व तिचा पती यांची भांडणे झाल्यामुळे पीडित बार्शी बसस्थानकावर आली असता तावरे याने पुन्हा फिर्यादीस रिक्षात बसवून लॉजवर घेऊन जाऊन बलात्कार केला. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून जबरदस्तीने उचलून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी किशोर हरिदास तावरे याच्यावर व भैय्या थिटे व गणेश शेळके यांनी मदत केली म्हणून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स.पो.नि. धनंजय ढोणे हे करत आहेत.