Sun, Jul 21, 2019 08:17होमपेज › Solapur › विजापूरमध्ये बँकेच्या वाहनातून 14 लाख लंपास

विजापूरमध्ये बँकेच्या वाहनातून 14 लाख लंपास

Published On: Dec 31 2017 1:27AM | Last Updated: Dec 30 2017 11:16PM

बुकमार्क करा
विजापूर : वार्ताहर

शहरातील मध्यवर्ती, गजबजलेल्या भागातील श्री सिद्धेश्‍वर सहकारी बँकेच्या आवारात बँकेच्या वाहनातून 14 लाख रुपये चोरीस गेल्याची घटना घडली आहे.

शनिवारी सकाळी 11.30 सुमारास शहरातील श्री सिद्धेश्‍वर मंदिरासमोरील श्री सिद्धेश्‍वर सहकारी बँकेच्या मुख्य शाखेतून बँकेच्या वाहनातून इतर शाखेत रक्‍कम घेऊन जात असताना, शस्त्रधारी सुरक्षारक्षकाचे लक्ष दुसरीकडे वेधून, वाहनातील 14 लाख रुपये असलेला ट्रंक लंपास केल्याची घटना घडली आहे.

बँकेच्या मुख्य शाखेतून तीन ट्रंकमधून जवळपास 40 लाख रुपये घेऊन जात असताना बँकेच्या आवारातच सिनेस्टाईलने एक ट्रंक लंपास करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलिसप्रमुख कुलदीपक कुमार जैन, अतिरिक्‍त पोलिसप्रमुख शिवकुमार गुणारे, गांधी चौक पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली असून, पाच ते सहा जणांच्या टोळीने हे कृत्य केले आहे. विशेष पोलिस पथकाची नियुक्‍ती करून अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या घटनेची नोंद गांधी चौक पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.