Sun, Mar 24, 2019 12:28होमपेज › Solapur › बाजार समितीसाठी शनिवारी आरक्षण सोडत

बाजार समितीसाठी शनिवारी आरक्षण सोडत

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 17 2018 10:00PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीची निवडणूक आता थेट शेतकर्‍यांमधून होणार आहे. त्यासाठी संचालक मंडळाच्या सर्वसाधारण गणातून निवडून देण्याच्या 15 जागांसाठी गण निश्‍चित करण्यात आले असून त्यापैकी 5 जागांवर आरक्षण होणार आहे.  त्यासाठी शनिवारी आरक्षण सोडत होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

शेतकर्‍यांना प्रथमच निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे 10 गुंठ्यांपेक्षा अधिक जमीन असणारा शेतकरी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे प्रारूप मतदार याद्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.  दुसरीकडे एकूण 17 संचालकांसाठी ही निवडणूक होणार असून यामध्ये व्यापारी आणि हमाल-तोलरा प्रवर्गातून दोन संचालक निवडले जाणार आहेत. उर्वरित 15 संचालक हे गणातून निवडून येणार आहेत. यापैकी पाच गण महिला, अनुसूचित जाती, भटक्या जमाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्या प्रशासनाने 15 गण पाडले असून यामध्ये कळमण, नान्‍नज, पाकणी, मार्डी, बोरामणी, बाळे, हिरज, कुंभारी, मुस्ती, होटगी, आहेरवाडी, कणबस, मंद्रुप, कंदलगाव, भंडारकवठे, औराद यापैकी कोणत्या गणावर कोणते आरक्षण पडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याचा फैसला आता शनिवारी होणार आहे. लॉटरी पद्धतीने 

हे आरक्षण सोडत होणार आहे. बाजार समितीसाठी दक्षिण आणि उत्तर  सोलापूर तालुक्यातील 144 गावांमध्ये  1 लाख 2 हजार 959 शेतकरी खातेदार आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूर बाजार समितीची निवडणूक 16 एप्रिलपूर्वी घेणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने निवडणूक शाखेने तयारी केली आहे.

सोलापूर बाजार समितीसाठी गण आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली गावे पुढीलप्रमाणे -

कमळण ः कळमण, कौठाळी, भागाईवाडी, साखरेवाडी, पडसाळी, वांगी, इचगाव, गावडी दारफळ, वडाळा. नान्नज ः नान्नज, रानमसले, बीबीदारफळ. पाकणी ः पाकणी, शिवणी, केगाव, गुळवंची, कोंडी, कारंबा, अकोलेकाटी. मार्डी ः नरोटेवाडी, मार्डी, सेवालालनगर, होनसळ, राळेरास, तरटगाव, एखरुक, हगलूर, हिप्परगा, खेड, भोगाव, बाणेगाव. बोरामगणी ः बोरामणी, गंगेवाडी, कासेगाव, उळे, उळेवाडी, वडजी, वरळेगाव, बक्षीहिरप्परगा, मुळेगाव तांडा, मुळेगाव, दोड्डी, तांदूळवाडी, पिंजारवाडी. बाळे ः बाळे, दहिटणे, शेळगी, शिवाजी नगर, देगाव, सोरेगाव, बसवेश्‍वरनगर, सलगरवाडी, नेहरुनगर, प्रतापनगर. हिरज ः हिरज, तिर्‍हे, बेलाटी, पाथरी, कवठे, तेलगाव, डोणगाव, भाटेवाडी. कुंभारी ः कुंभारी, कसबे सोलापूर, मजरेवाडी, कुमठे, हत्तुर. मुस्ती ः मुस्ती, संगदरी, दर्गनहळ्ळी, शिरपनहळ्ळी, कर्देहळ्ळी, रामपूर, चिंचोळी, वडगाव, दिंडूर, तीर्थ. होटगी ः होटगी, यत्नाळ, तोगराळी, गुर्देहळी, हणमगाव, वळसंग, शिंगडगाव, हिपळे, औज. आहेरवाडी ः आलेगाव, होटगी स्टेशन, फताटेवाडी, मद्रे, सिंदखेड, सावतखेड, घोडातांडा. कणबस ः कणबस, शिरवळ, इंगळगी, आचेगाव, बोरूळ, तिल्लेहाळ,  बंकलगी. मंद्रुप ः मंद्रुप, नांदणी, बसवनगर, होनमुर्गी, बिरनाळ, चंद्रहाळ, वडकबाळ, वांगी, समशापूर, नंदूर. कंदलगाव ः कंदलगाव, गुंजेगाव, अकोले, मंद्रुप, मनगोळी, गावडेवाडी, येेळेगाव, शंकरनगर, विंचूर, वडापूर. भंडारकवठे ः भंडारकवठे, निंबर्गीं, कुसूर, खानापूर, तेलगाव, बाळगी, सादेपूर, लवंगी, कारकल. औराद ः औराद, राजूर, संजवाड, बंदलगी, बोळकवठे, हत्तरसंग, कुडल, बरुर, चिंचपूर, टाकळी, कुरघोट, औज, मंद्रुप, माळकवठे.