Wed, Nov 14, 2018 23:45होमपेज › Solapur › रिक्षाचालकाने सापडलेला लॅपटॉप, मोबाईल केला परत

रिक्षाचालकाने सापडलेला लॅपटॉप, मोबाईल केला परत

Published On: Dec 24 2017 1:47AM | Last Updated: Dec 23 2017 9:47PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

गावाकडे निघालेल्या जय बाळू साळुंखे (रा. परळी, जि. बीड, सध्या मेडीकल कॉलेज हॉस्टेल, सोलापूर) या भावी डॉक्टराचा लॅपटॉप व मोबाईल असा 92 हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग महिबूब अब्दुल गफूर चरखे (रा. शास्त्री नगर, सोलापूर) या रिक्षाचालकाने परत करुन प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. त्यामुळे फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्यावतीने त्या प्रामाणिक रिक्षाचालकाचा सन्मान करण्यात आला.

शनिवारी सकाळी जय साळुंखे हे परळी येथे गावाकडे जाण्यासाठी दोन बॅगा घेऊन होटगी नाका चौकातून एस. टी. स्टॅन्ड येथे जाण्यासाठी एका रिक्षातून गेले. एस. टी. स्टॅन्ड येथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्याजवळील एक बॅग रिक्षामध्ये राहिली असून त्यामध्ये 52 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप व 40 हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल हॅन्डसेट होते. त्यामुळे साळुंखे यांनी रिक्षा स्टॉपवर येऊन रिक्षाची पाहणी केली असता ती मिळून आली नाही. म्हणून त्यांनी तरटी नाका पोलिस चौकी गाठली व पोलिस नाईक हार, सय्यद व पोलिस शिपाई वसेकर यांना सर्व हकीकत सांगितली.

त्यानंतर पोलिस कर्मचार्‍यांनी साळुंखे यांच्या चारही मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणताही रिप्लाय आला नाही. त्यानंतर  काही  वेळानंतर  पोलिस नाईक सय्यद  यांच्या  मोबाईलवर  कॉल आला व रिक्षाचालकाने एका प्रवाशाची बॅग आपल्या रिक्षामध्ये विसरली  असल्याचे सांगितले. त्यावेळी त्या रिक्षाचालकाला फौजदार चावडी पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. रिक्षाचालक चरखे यांनी पोलिस ठाण्यात येऊन साळुंखे यांची बॅग परत केली. त्यावेळी पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या हस्ते रिक्षाचालक चरखे यांचा सन्मान केला.