Wed, Jan 16, 2019 15:38होमपेज › Solapur › सोलापूर: कुंभारीतील कटारे बंधूंवर खुनी हल्ला

सोलापूर: कुंभारीतील कटारे बंधूंवर खुनी हल्ला

Published On: Feb 03 2018 9:40PM | Last Updated: Feb 03 2018 9:40PM सोलापूर : पुढारी ऑनलाईन

कुंभारी येथील गुरूनाथ कटारे खून प्रकरण ताजे असतानाच शनिवारी पुन्हा एकदा  कुंभारी वासियांनी रक्तरंजीत खेळ अनुभवला. गुरूनाथच्या दोघा पुतण्यांवर गावातीलच उपसरपंच आप्पासाहेब बिराजदार यांनी 20 ते 25 तरूणांच्या जमावासह हल्ला चढवत गंभीर जखमी केले आहे. दोघा जखमींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

शहरापासून जवळच असलेल्या कुंभारी गावात दोन दिवसांपूर्वी वाढदिवसाच्या कार्यक्रमात नाव घेतले नाही म्हणून उपसरपंच आप्पासाहेब बिराजदार यांनी गावातीलच चन्नवीर कटारे आणि नागनाथ कटारे यांना मारहाण केली होती. यानंतर कटारे यांनी वळसंग पोलिसात रितसर तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर शनिवारी दोघे कटारे बंधू गावातून जात असताना बिराजदार आणि इतर जमावाने तलवार, काठ्या, फायटर आणि गावठी पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांच्यावर "तुमच्या काकाला जसे मारले तसे तुम्हाला मारून टाकतो" असे म्हणत हल्ला चढवला.

यात दोघेही कटारेबंधू गंभीर जखमी झाले असून त्यांना सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, रक्तबंबाळ अवस्थेत कटारेबंधू यांनी थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात जावून आपली कैफियत पोलिस अधिक्षकांकडे मांडली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनेनंतर गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.