Thu, Nov 22, 2018 16:36होमपेज › Solapur › कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला

कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला

Published On: Jan 03 2018 1:18AM | Last Updated: Jan 02 2018 10:52PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

उत्तर  सोलापूर तालुक्यातील कवठे येथील गोविंद तांडा येथे हातभट्टीच्या कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हातभट्टीचालकांनी हल्ला करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबत सलगर वस्ती पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस शिपाई अफरोज म. सोफी शेख (ब. नं. 346, नेमणूक- सलगर वस्ती पोलिस ठाणे) यांच्या फिर्यादीवरुन   रतूबाई धर्मा पवार, सोनाबाई   राठोड, ताराबाई केशव राठोड, सुनीता भीमा पवार (रा. गोविंद तांडा, उत्तर सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कवठे येथील गोविंद तांड्यात राहणार्‍या रतूबाई पवार या महिलेकडे हातभट्टीसाठी लागणारे गूळमिश्रीत रसायन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होत त्यावरुन सलगर वस्ती पोलिस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी   रविवारी  मध्यरात्री   गोविंद  तांडा येथे छापा टाकला.  त्यावेळी पवार हिच्या घरात 21 हजार 400 रुपये किंमतीचे रसायन मिळून आले. यावेळी कारवाई करीत असताना रतूबाई पवार व इतर महिलांनी पोलिसांच्या अंगावर धावून त्यांना धक्‍काबुक्‍की केली.  महिला पोलिस शिपाई शेख यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.