Fri, Mar 22, 2019 05:52
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › कुंभारी खुनीहल्ला प्रकरणी, आरोपींचा शोध सुरू

कुंभारी खुनीहल्ला प्रकरणी, आरोपींचा शोध सुरू

Published On: Feb 04 2018 10:56PM | Last Updated: Feb 04 2018 8:26PMसोलापूर : प्रतिनिधी

कुंभारी येथे झालेल्या खुनी हल्ला प्रकरणी वळसंग पोलिसांनी संशयित आरोपींच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती वळसंग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंद्रजित सोनकांबळे यांनी दिली. तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कुंभारी येथील गुरूनाथ कटारे खून प्रकरण ताजे असतानाच शनिवारी पुन्हा एकदा कुंभारी गावात रक्‍तरंजित खेळ पहावयास मिळाला. अगदी क्षुल्लक कारणावकरून हल्ला झाला. गुरूनाथच्या दोघा पुतण्यांवर गावातीलच उपसरपंच आप्पासाहेब बिराजदार यांनी 20 ते 25 तरुणांच्या जमावासह हल्ला चढवत गंभीर जखमी केले आहे. दोघा जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
शहरापासून जवळच असलेल्या कुंभारी गावात दोन दिवसांपूर्वी वाढदिवसाच्या कार्यक्रमात नाव घेतले नाही म्हणून उपसरपंच आप्पासाहेब बिराजदार यांनी गावातीलच चन्नवीर कटारे आणि नागनाथ कटारे यांना मारहाण केली होती. यानंतर कटारे यांनी वळसंग पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दोन्ही गटांच्या तरुणांना बोलावून समजूत काढली होती. दोन्ही गटांनी आम्ही आपसात भांडण मिटवून घेतो, असे सांगितले होते. त्यानंतर शनिवारी दोघे कटारेबंधू गावातून जात असताना बिराजदार आणि इतर जमावाने तलवार, काठ्या, फायटर आणि गावठी पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांच्यावर तुमच्या काकाला जसे मारले, तसे तुम्हाला मारून टाकतो, असे म्हणत हल्ला चढवला.

यात दोघेही कटारेबंधू गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, रक्‍तबंबाळ अवस्थेत कटारेबंधू यांनी थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन आपली कैफियत पोलिस अधीक्षकांकडे मांडली.