Tue, Jun 02, 2020 19:04होमपेज › Solapur › अटलजींच्या अस्थीला सोलापूरकरांचा सलाम (व्हिडिओ)

अटलजींच्या अस्थीला सोलापूरकरांचा सलाम (व्हिडिओ)

Published On: Aug 23 2018 12:06PM | Last Updated: Aug 23 2018 12:06PMसोलापूर : प्रतिनिधी

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश आज सकाळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते रेल्वेने सोलापुरात आणण्यात आला. यावेळी अटलजींच्या अस्थीचे दर्शन घेण्यासाठी नगरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. 

रेल्वे स्थानकापासून फुलांनी सजविलेल्या उघड्या जीपमध्ये अस्थीकलशाची मिरवणूक काढण्यात आली. स्टेशनपासून महपौर बंगला, डफरीन चौक, महानगरपालिका, पार्कचौक, सरस्वती चौक येथून शिवाजी चौकाला वळसा घालून राजवाडे चौक येथील पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयासमोर अस्थिकलश ठेवण्यात आला. साडे अकरा पर्यंत सोलापूरकरांनी अटलजींच्य अस्थीकलशाचे दर्शन घेतले. त्यानंतर अस्थीकलश पंढरपूरला नेण्यात आला.