Sun, Apr 21, 2019 00:40होमपेज › Solapur › सोलापूर : मनपा सभा तहकुबीचा विक्रम लिम्का बुकात नोंदवा

सोलापूर : मनपा सभा तहकुबीचा विक्रम लिम्का बुकात नोंदवा

Published On: Apr 05 2018 6:58PM | Last Updated: Apr 05 2018 6:56PMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिकेतील सत्ताधार्‍यांच्या नाकर्तेपणाला कंटाळलेल्या काँग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले यांनी चक्क मनपा सभा तहकुबीच्या ‘विक्रमा’ची लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये नोंद व्हावी, असा अजब प्रस्ताव सादर केला आहे. जर या विक्रमाची नोंद झाल्यास सोलापूरचे जगभरात हसे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

सोलापूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली. या निवडणुकीत १०२ पैकी ४९ ठिकाणी भाजपचे नगरसेवक निवडून आले. ८ मार्च २०१७ रोजी पहिली सर्वसाधारण सभा झाली. त्‍यानंतरच्या ८ मार्च २०१७ ते ३१ मार्च २०१८ दरम्‍यान २३ सर्वसाधारण सभा बोलाविण्रात आल्र्या. त्‍यापैकी तब्बल १६ सभा या कोणत्‍याही चर्चेविना तहकूब करण्यात आला. ज्या अपेक्षेने नागरिकांनी भाजपला बहुमत दिले त्याची पूर्तता होताना दिसत नाहीत. भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे या सभा वारंवार तहकूब झाल्याने विकासाबाबतचे अनेक विषर रेंगाळले आहेत. परिणामी शहर विकासापासून वंचित आहे, असे नगरसेवक भोसले यांचे म्हणणे आहे.

सभा तहकुबीला वैतागून समस्त सोलापूरकरांच्यावतीने व काँग्रेसच्या माध्यमातून सभा तहकुबीच्या अजब विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये नोंद व्हावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश व काँग्रेसचे सरचिटणीस व नगरसेवक विनोद धर्मा भोसले यांनी दिला आहे. त्यांनी ई-मेल द्वारे हा प्रस्ताव लिम्का बुक ऑफ रेकार्डकडे पाठविला आहे.

एकंदर उपहासात्मकपणे दिलेला हा प्रस्ताव यदाकदाचित दखलपात्र ठरला तर सोलापूर मनपाचा नाकर्तेपणा सार्‍या जगापुढे चव्हाट्यावर येऊन सोलापूरचे नक्कीच हसे होणार असल्याची चर्चा सुरू आहे.