Tue, Jul 16, 2019 01:36होमपेज › Solapur › आषाढीच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या 

आषाढीच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या 

Published On: Jun 27 2018 1:22AM | Last Updated: Jun 26 2018 8:21PMसोलापूर : रामकृष्ण लांबतुरे 

दक्षिण काशी पंढरपूरची आषाढीवारी भयमुक्‍त आणि वारकर्‍यांना त्रास होऊ नये, म्हणून ग्रामीणमधील 22 फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून उपद्रवी  गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली. 

जिल्ह्यातील 25 पोलिस ठाण्यातील उपद्रवी आरोपींना अटक करण्याचा सपाटा लावला आहे. अपहरण, मारामारी, दारुबंदी, चोरी, दंगल, विनयभंग, घरफोडी, फसवणूक अशा गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे - वळसंग हद्दीतील गुन्ह्यात हवा असलेला उमर नासिर नाईकवाडी (रा. विजापूर वेस, लक्ष्मी मार्केटजवळ, सोलापूर), माणिक अण्णप्पा जाधव (रा. भानुदासतांडा, ता. दक्षिण सोलापूर), गोपू बाबू राठोड (रा. मुळेगावतांडा, ता. दक्षिण सोलापूर), शंकर रामचंद्र चव्हाण (कचरेवाडी, ता. मंगळवेढा),  शिवाजी किशोर शिंदे (वय 22, वाखरी, ता.पंढरपूर), प्रकाश धुळा खरात (वय 21), रामचंद्र हणुमंत कोळेकर (वय 26), महेश सुखदेव जानकर (वय 23), सर्जेराव दगडू मासाळ (वय 31), सागर अजित कोळेकर (वय 22), महेश जनार्दन कोळेकर (वय 21, सहा जण  रा. सोनके, ता. पंढरपूर), विकास हरि खांडेकर (रा. पाकणी, ता. उत्तर सोलापूर), युवराज अनिल काळे (वय20, कैकाडीमठाचेमागे, अनिल नगर, पंढरपूर), प्रशांत नवनाथ मिसाळ (वय 22, झेंडे गल्ली, पंढरपूर), बबलू उर्फ प्रवीण तात्या क्षीरसागर (वय 22 , ओझेवाडी, ता. पंढरपूर), संजय लक्ष्मण नवगिरे (वय 40,रा. गुळवंची, ता. उत्तर सोलापूर), प्रमोद नवलकिशोर सुधा (वय 43, मड्डी वस्ती), गुलाब महिबूबसाहेब खैराट (दुधनी, ता. अक्क्‍लकोट), ईश्‍वर गणपत सरडे, सज्जन तानाजी गोरे (दोघे रा. सापटणे भो., ता. माढा),  रवि तिम्मा बंदपट्टे (वय 26, संत पेठ, पंढरपूर), कैलास नाना माळी (वय 32, रा.खडकी, ता. करमाळा) ही कारवाई पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली  वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल अल्ताफ काझी, पोलिस कॉन्स्टेबल पांडुरंग काटे, सचिन वाकडे, निशांत ठोकळे, राजशेखर निंबाळे यांनी केली.