Thu, Mar 21, 2019 23:21
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › सरकार मातंग समाजालाही शिक्षा देतंय : सचिन साठे 

सरकार मातंग समाजालाही शिक्षा देतंय : सचिन साठे 

Published On: Aug 05 2018 3:17PM | Last Updated: Aug 05 2018 3:17PMसोलापूर : पुढारी ऑनलाईन

आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात झालेल्या भ्रष्टाचारात काही आरोपी अडकले. ते गजाआड शिक्षाही भोगत आहेत मात्र त्यांना शिक्षा देताना महामंडळ बंद करुन अवघ्या समाजालाच सडविण्याच काम या राज्य शासनाच्यावतीने केले जात असल्याचा आरोप आण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी केला. नीरव मोदी, विजय मल्ल्या यांनी बॅंकेच्या पैशांचा अपहार केला म्हणून त्यांच्या बॅंकावर कारवाई केली नाही. तसाच न्याय आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडाळाच्या बाबतीत द्यावा अन् पुन्हा महामंडळ सुरु करावे अशी मागणी सचिन साठे यांनी केली. 

आण्णाभाऊंचे कुटुंब समाजाच्या भेटीला या विशेष अभियानांतर्गत सचिन साठे हे राज्याच्या विविध जिल्हात दौरा करत आहेत. त्यानिमित्त ते आज सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. सचिन साठे म्हणाले की आण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा यासाठी संपूर्ण कुटुंब गेल्या वर्षी आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते. मात्र, केवळ आश्वासनाशिवाय दुसरे काहीच पदरात पडले नसल्याचे ते म्हणाले.

सध्याच्या सरकारकडून आण्णाभाऊना भारतरत्न दिला जाईल असे आम्हाला वाटत नाही. कारण हे पूर्णत: जातीयवादी सरकार आहे. त्यामुळे आम्ही आता या सरकारच्या विरोधात बंड सुरु केले आहे असे सचिन साठे म्हणाले. आता आमच्या समाजातून आमचा नेता उभा केला जाईल व धर्मनिरपेक्ष पक्षाबरोबर आम्ही असू समाजात फिरताना लोकांच्या मतानुसार कोणत्या पक्षासोबत जायचे ते ठरवू असे ते म्हणाले. तसेच येत्या १०१९ च्या निवडणूकीत निश्चित आम्ही भाजप बरोबर नसू व त्याचा मोठा फटका भाजपला बसेल असेही त्यांनी सांगितले.