Wed, Jun 26, 2019 17:54होमपेज › Solapur › बोलेरो जीपच्या अपघातात एक ठार, १ गंभीर 

बोलेरो जीपच्या अपघातात एक ठार, १ गंभीर 

Published On: Jan 12 2018 9:40AM | Last Updated: Jan 12 2018 9:39AM

बुकमार्क करा
मंगळवेढा : प्रतिनिधी

आधंळगाव एम.एस.ई.बी. जवळ बोलेरो जीपच्या अपघातात एक महिला ठार झाली तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. पिंटु शेळके असे जखमीचे नाव आहे. मृत महिलेचे नाव समजू शकले नाही. गुरुवारी राञी दहाच्या दरम्यान हा अपघात झाला. 

जखमी पिंटु शेळके व त्यांच्या पत्नी सोलापूरहून लक्ष्मी दहिवडीकडे निघाले होते. आधंळगाव एम.एस.ई. बी. जवळ आल्यावर त्यांची बोलेरो गाडी खड्ड्यात कोसळली. त्‍यात त्‍यांच्या पत्‍नीचा जागीच मृत्‍यू झाला तर, शेळके गंभीर जखमी झाले. त्‍यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरु आहेत.