होमपेज › Solapur › अकलूज येथे मटका अड्ड्यावर छापा; अकरा जण ताब्यात

अकलूज येथे मटका अड्ड्यावर छापा; अकरा जण ताब्यात

Published On: Feb 28 2018 1:11AM | Last Updated: Feb 27 2018 9:46PM



अकलूज : वार्ताहर

पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांच्या पथकाने अकलूज येथील अवैध धंद्यांवर छापा टाकून 2,57,940 रु. च्या मुद्देमालासह 11 जणांना पकडलेे आहे.अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी दि 26 रोजी अकलूज शहरात मुंबई मटका अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकून 11 जणांना पकडले.

सुरेश लक्ष्मण साठे, लालचंद पन्‍नालाल लकेरी, प्रितेश लालचंद लकेरी, इकबाल सुलतान तांबोळी, सागर पोपट काटे, आकाश अशोक मोरे, दिलावर यासिन शेख, युनुस इब्राहिम शेख (सर्व रा. अकलूज) मटका घेत असताना त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण 2 लाख 57,  हजार 940 रु. किमतीचा  मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. तर बुकी मालक प्रशांत कुलकर्णी, शकील मुल्ला, महंमद तांबोळी यांच्याविरुद्ध अकलूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.