Fri, Apr 26, 2019 01:22होमपेज › Solapur › अकलूज येथे 105 फूट उंचीवर फडकला तिरंगा

अकलूज येथे 105 फूट उंचीवर फडकला तिरंगा

Published On: Jan 28 2018 10:16PM | Last Updated: Jan 28 2018 9:00PMअकलूज: तालुका प्रतिनिधी 

ग्रामपंचायत पातळीवरील देशात पहिला सर्वात उंच  ठरलेल्या  ध्वज स्तंभावर भव्य आकाराचा तिरंगा फडकविण्यात आला. खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते या ध्वजारोहण करण्यात आले.   खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या खासदार फंडातून सुमारे वीस लाख रुपये खर्चाच्या या राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यात आली आहे.

 या ध्वजस्तंभावर तीस फूट लांबी व वीस फूट रुंद असणारा तिरंगा ध्वज आहे. याचे व्यवस्थापन अकलूज ग्रामपंचायतीकडे देण्यात आले आहे. ध्वजारोहण कार्यक्रमात शिक्षण प्रसारक मंडळाच्या एन. सी. सी, आर. एस. पी, स्काऊट, गाईड, घोषवाक्य पथकाने सलामी व मानवंदना दिली. 

या वेळी सौ. नंदिनीदेवी मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील,  माजी खा.रणजितसिंह मोहिते-पाटील, आ.हणमंत डोळस, शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ. शितलदेवी मोहिते-पाटील, कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील,  पंचायत समिती सभापती सौ. वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, उपसभापती किशोर सुळ, प्रांतअधिकारी सौ. शमा पवार, डीवाय. एस. पी. मंगेश चव्हाण, माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, विस्तार अधिकारी महालिंग नकाते, आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. यावेळी  जिल्हा परिषद शाळेतील सुमारे 750 विद्यार्थी यांच्यासह अकलूजमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.