Sat, Jul 20, 2019 23:21होमपेज › Solapur › अवैध वाळू उपशावर तहसिलदारांची कारवाई

अवैध वाळू उपशावर तहसिलदारांची कारवाई

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

अक्कलकोट :प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील कलकर्जाळ  येथे तहसिलदार दीपक वजाळे यांनी  अवैध वाळु माफिया विरोधात रविवारी धडक कारवाई केली. तहसिलदार वजाळे यांनी कल कर्जाळ येथील अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी जप्त करून दोन व्यक्तीनां ताब्यात घेण्यात घेतले. तर तीन अज्ञात व्यक्ती विरोधात दक्षिण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तहसिलदार दिपक वजाळे यांच्या धडक कारवाईने अक्कलकोट तालुक्यातील वाळु माफियांचे धाबे दणाणले आहेत.

तहसिलदार दिपक वजाळे यांनी अक्कलकोट  तालुक्यातील अवैध वाळु रोखण्यासाठी नऊ  मंडलात नऊ पथके तयार केली होती. ३१ सप्टेबर २०१७ रोजी सर्वच ठिकाणच्या वाळु उपसा परवान्याची मुदत संपली होती. यानंतर तालुक्यात वाळु उपसा हा सुरूच होता. याला रोखण्यासाठी शेगाव,देवी कवठा, धारसंग, खानापुर, कुडल, म्हैसलगी, आळ्गे, गुडेवाडी, सुलेरजवळगे,पान मंगरूळ या ठिकाणी फिरते पथक तहसिलदार वजाळे यांनी नेमले होते. याचाच भाग म्हणून तहसिलदार वजाळे यांनी कल कर्जाळ येथे रविवारी  पहाटे पासुनच कारवाई केली. तहसिलदार वजाळे यांनी सापळा रचुन १२ तास कारवाई केली. यावेळी २ वाळु उपसा करणाऱ्या बोटी जप्त करण्यात आल्या.  नदीतुन एक बोट बाहेर कादून ती पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. तसेच २ व्यक्तीना ताब्यात घेण्यात आले आहे. तर तीन अज्ञात व्यक्ती विरोधात  अक्कलकोट दाक्षिण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात  येणार असुन, मोक्का कायदया अंर्तगत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार दिपक वजाळे यांनी दिली. तहसिलदार वजाळे यांच्या अवैध वाळु उपसा विरोधातील धडक कारवाईमुळे अवैध वाळु उपसा करणाऱ्याचें धाबे दणाणले आहेत.