Sat, Nov 17, 2018 18:53होमपेज › Solapur › रेवणसिद्ध फुलारीस कर्नाटक सरकारचा बालगौरव पुरस्कार

रेवणसिद्ध फुलारीस कर्नाटक सरकारचा बालगौरव पुरस्कार

Published On: Feb 27 2018 8:20AM | Last Updated: Feb 26 2018 10:07PMअक्कलकोट : प्रतिनिधी

कर्नाटक सरकार महिला व बालकल्याण व कर्नाटक बालविकास अकादमी धारवाड यांच्याकडून यंदाचा बालगौरव पुरस्कार तालुक्यातील तोळणूर जि.प. कन्नड शाळेतील दिव्यांग विद्यार्थी रेवणसिद्ध पुंडलिक फुलारी यास जाहीर झाला आहे. 

मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी धारवाड येथील कार्यक्रमात महिला व बालकल्याण मंत्री उमाश्री धारवाड,  पालकमंत्री विनय कुलकर्णी, संतोष लाड, कामगार व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते जगदीश शेट्टर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

यंदा प्रथमच कर्नाटक राज्य व्यतिरिक्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती भागातील कन्नड भाषिक विद्यार्थ्याला त्याच्या संगीत क्षेत्रातील तबलावादनसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेल्या रेवणसिद्ध फुलारी लहानपणापासूनच संगीत क्षेत्रात तबलावादन, गायन, हार्मोनियम वादन, कॅसिओ, गिटार, सितार आदी चांगल्या प्रकारे वाजवतो. विशेष म्हणजे तबलावादन करत शास्त्रीय संगीताचे गायन करतो. सध्या तोळणूर कन्नड शाळेत इयत्ता 4 थी मध्ये शिकत असून विजयपूरचा कुमारेश्‍वर संगीत महाविद्यालयातील संगीत शिक्षक संगीत गुरू म्हणून तोटय्या गवई यांचे मार्गदर्शन मिळत आहे.